*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*होळी*
लाकडाच जळणं
रंगा रंगांची उधळण
म्हणे हर्षाचा दिन
आला होळीचा सण
शिशिराचं जाणं
वसंताचं आगमन
पुनवेच चांदणं
लखलखत्या ज्वाळा
रणरणतं ऊन
म्हणे हर्षाचा दिन
आला होळीचा सण
आजुबाजू रांगोळी
वर फुलांच्या माळी
नैवेद्य पुरण पोळी
संगे संसाराची झोळी
नाचत-गात वाजत गाजत
पेटली होळी
होळीचे हे ऋण
कधी तुटेल तोरण
डोळा फिटेल पारण
म्हणे हर्षाचा दिन
आला होळीचा सण
नको त्या बोंबा
मधे जळे कुठे बांबू
कुठे एरंडाचा खांबा
बाजू पेटल्या गोवऱ्या
ज्वाळा निघाल्या सासुरा
म्हणे पुन्हा परत येईन
त्याचं होईन स्मरण
तेच होळीच मरण
म्हणे हर्षाचा दिन
आला होळीचा सण
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
8208667477.
7588318543.