You are currently viewing जानवली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जानवली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

कणकवली:

मुंबई गोवा महामार्गावर जानवली येथे अज्ञात कारने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गजानन केशव शेट्ये ( सध्या रा. जानवली वाकाडवाडी , मूळ रा. तोंडवली, कणकवली ) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जानवली टिव्हीएस शोरूम नजीक घडला.
गजानन शेट्ये हे आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हा क्र. MH -07 -Y – 8488 घेऊन कणकवलीच्या दिशेने येत होते. त्याचवेळी कणकवली च्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात कारचलाकाने मागून शेट्ये यांच्या ऍक्टिव्हाला धडक देऊन कारचालक कारसह पसार झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून रस्त्यावर फेरफटका मारणारे दामोदर आबाजी सावंत ( रा. जानवली, डोंगरेवाडी ) यांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेतली. .
त्यांच्यासोबत जानवली सरपंच शुभदा रावराणे, पोलिस पाटील मोहन सावंत, तुकाराम तावडे, आशिष राणे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
दामू सावंत यांनी तात्काळ ऍम्ब्युलन्स मागवून अपघातग्रस्त शेट्ये याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वीच शेट्ये यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान अपघात घडल्यानंतर अज्ञात कारचालकाने कारसह अपघात स्थळावरून पलायन केले असले तरी ती टिव्हीएस शोरूम च्या सीसीटीव्ही मध्ये अपघाताची घटना रेकॉर्ड झाल्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या कारचा शोध घेणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा