नवीन संच मान्यतेत शारीरिक शिक्षण शिक्षक पद कायम राहणार- आम.कपिल पाटील

नवीन संच मान्यतेत शारीरिक शिक्षण शिक्षक पद कायम राहणार- आम.कपिल पाटील

क्रीडा शिक्षक महासंघाच्या ‘वाटचाल’ ‘नियतकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन

“वाटचाल ” आधूनिक शारीरिक शिक्षणाची”
क्रीडा क्षेत्रातील नियतकालिकाची उभारली गुढी!

महाराष्ट्रातील क्रीडा शिक्षकांचा अनोखा उपक्रम

तळेरे: प्रतिनिधी

खेळामुळे समाजातील प्रत्येक घटक जोडला जातो.खेळ जात, धर्म , भेदभाव मानत नाही.सुदृढ देश व समाज घडविण्यासाठी शारीरिक शिक्षण विषयाला विशेष महत्त्व प्राप्त होणे गरजेचे आहे.नवीन संच मान्यतेची शारीरिक शिक्षण शिक्षक पदाची पुर्नस्थापना होणार असून येत्या नवीन संचमान्यतेत कला व शारीरिक शिक्षण शिक्षक हे पद निश्चितच कायम राहणार असल्याचे माहिती शिक्षक आम.कपिल पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रातील नावीन्याच्या ध्यास घेतलेल्या क्रीडा क्षेत्रातील क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ” महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघ अहमदनगर या संघटनेच्या ”वाटचाल’-आधूनिक शारीरिक शिक्षणाची” या डिजिटल नियतकालीचा प्रकाशन सोहळा आॅनलाईन पध्दतीने पार पडला. या कार्यक्रमात आम. कपिल पाटील प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
दरम्यान या आॅनलाईन सोहळ्यास उपस्थित सर्व आमदार महोदयांच्या शुभहस्ते लिंक ओपन करून ऑनलाईन पद्धतीने प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या प्रकाशन सोहळ्यासाठी मुंबई विभागाचे शिक्षक आम.कपिल पाटील, अमरावती विभागाचे शिक्षक आम. किरण सरनाईक, नाशिक विभागाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे,पुणे विभागाचे आम. जयंत आसगावकर, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, अमरावती शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सहसचिव शिवदत्त ढवळे,’ उपाध्यक्ष आनंद पवार, घनश्याम सानप, वाटचाल’ नियतकालिकाचे संपादक राजेश जाधव ,कार्यकारी संपादक सुवर्णा देवळाणकर, अमरावतीच्या माधुरीताई चेंडके व सर्व जिल्हा अध्यक्ष सचिव, राज्य व जिल्हा पदाधिकारी, संपादकिय मंडळातील सर्व सदस्य तसेच राज्यभरातील क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
याप्रसंगी क्रीडा क्षेत्र व शारीरिक शिक्षण शिक्षक यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करताना आम. किरण सरनाईक म्हणाले की, शासनाचा शारीरिक शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असून त्यामुळे अनेक कॉलेज बंद पडले आहेत.संच मान्यतेची हे पद कायम राहण्यासाठी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार असून महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षकांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची प्रत्येक समस्या शासन दरबारी मांडण्याचेही त्यांनी याप्रसंगी आश्वासन दिले

शाळा या आॅलंम्पियन खेळाडू बनविण्याचे केंद्र व्हावे- आम. सुधीर तांबे

सुदृढ समाज घडविण्याचे हुकमी माध्यम म्हणजे कला व क्रीडा हे क्षेत्र असून,क्रीडा शिक्षक हा त्या शाळेचा आत्मा असतो, राज्यातील शाळा या आॅलंम्पियन खेळाडू बनविण्याचे केंद्र व्हावे इतके सहकार्य शासनाने करायला हवे. कारण सुदृढ राष्ट्र निर्मितीत शारीरिक शिक्षण शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे गौरवोद्गार आम.डाॅ.सुधिर तांबे यांनी याप्रसंगी काढले, महाराष्ट्रातील पडून असलेल्या गायरान जमिनीचा वापर क्रीडा मैदान म्हणून होण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचेही याप्रसंगी यांनी माहिती दिली.

पवित्र पोर्टलवर बीपीएड पद आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन आम.जयंत आसगावकर यांनी देत’ वाटचाल नियतकालिक राज्यातील क्रीडा शिक्षक व विद्यार्थ्यांना दीपस्तंभासारखे निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा आशावाद व्यक्त केला.

आम. अभिजीत वंजारी यांनीही नियतकालिकांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

शासनाने तात्काळ नोकर भरती सुरू करावी-:-राजेंद्र कोतकर

राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त ५-७ शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या जागा भरल्या आहेत. शासनाने तात्काळ पुन्हा शारीरिक शिक्षण शिक्षक नोकर भरती सुरू करावी अन्यथा सर्व संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असेही शासनाला त्यांनी याप्रसंगी सुचित केले ग्रेस गुण, संचमान्यता, वरीष्ठ व निवडश्रेणी प्रश्ना बाबत लक्ष घालण्याची विनंती त्यांनी आमदार महोदयांना केली.

राजेश जाधव शिवदत्त ढवळे , डॉ. मयूर ठाकरे , डॉ.जितेंद्र लिंबकर , राजेंद्र पवार , दिनेश म्हाडगूत, राजेंद्र पवार , घनःशाम सानप,महेंद्र हिंगे, सुवर्णा देवळाणकर,दत्तात्रय मारकड, तायप्पा शेंडगे, शेखर शहा, दत्तात्रय हेगडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रकाशन सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेचे अध्यक्ष संजय वेतुरेकर,क्रीडा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण,राज्य अभ्यास गट सदस्य शैलैश नाईक,
आदींसह युट्युब व फेसबुक लाईव्हवर बहुसंख्य क्रीडा शिक्षक बंधुभगिनी हजेरी लावली होती.
महासंघाचे उपाध्यक्ष आनंद पवार यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले . तर आभार प्रितम टेकाडे यांनी मानले . तंत्रस्नेही म्हणून गणेश म्हस्के,राहुल काळे यांनी काम केले .
या प्रकाशन सोहळ्यासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुल कोकमठाण यांचे तांत्रिक सहकार्य लाभले .

नियतकालिक ‘वाटचाल ‘ चा फोटो

प्रतिक्रिया व्यक्त करा