You are currently viewing सावित्रीबाईंची शिकवण नेहमीच आचरणात आणा – प्रज्ञा परब

सावित्रीबाईंची शिकवण नेहमीच आचरणात आणा – प्रज्ञा परब

वेंगुर्ला

वेंगुर्ला महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या कॅम्प येथील काथ्या प्रकल्पांत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्रियांवर अनंत उपकार आहेत.

महिलांनी सावित्रीबाईंचे स्मरण जयंती किवा पुण्यतिथी पुरते न करता त्यांच्या शिकवणीची आठवण नेहमीच आचरणात आणावी. स्वयंरोजगारासाठी स्वतःला झोकून देऊन शासनाने दिलेल्या मदतीचा उपयोग समाजाच्या किवा स्वतःच्या आर्थिक उन्नत्तीसाठी लावावा हिच खरी त्यांना आदरांजी ठरेल असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे, सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या चेअरमन प्रविणा खानोलकर, सत्कारमूर्ती प्रभावती वायंगणकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =