You are currently viewing बांदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाफोली जत्रोत्सवात बसली जुगाराची मैफिल

बांदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाफोली जत्रोत्सवात बसली जुगाराची मैफिल

*खाकीच्या आशीर्वादावर पट*

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील बांदा जवळच्या वाफोली गावात आज असलेल्या जत्रोत्सवात जुगाराचे फड बसले असून खाकीच्या आशीर्वादानेच पट बसल्याचे बोलले जात आहे. संवाद मीडियाने दोन दिवसांपूर्वी बांदा पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येणाऱ्या जत्रोत्सवात जुगाराला परवानगी अशाप्रकारे बातमी प्रसिद्ध केली होती, त्याचीच प्रचिती बांदा गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील वाफोली गावातील जत्रोत्सवात आज जुगाराचे पाल टाकून मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू झाल्याने संवादची बातमी खरी असल्याचे दिसून येत आहे.

वाफोली येथे सुरू असलेल्या जत्रोत्सवात आज जोरदार पट (जुगार) सुरू झाल्याने खाकी वर्दी जोरदार चर्चेत आली असून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रमुखांचा जिल्ह्यातील खाकी वर्दीवर अंकुश नसल्याचे चित्र समोर येत आहे. वाफोली जत्रोत्सवात बिनधास्त सुरू झालेले जुगाराचे फड म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षकांना अंधारात ठेऊन स्थानिक पोलीस जुगाराला सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे खाकीवर जिल्हा पोलीस अधिक्षकांची वचक नसल्याचे दिसून आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =