You are currently viewing कणकवलीचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची बदली

कणकवलीचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची बदली

कणकवलीचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची बदली

कणकवली :

जानेवारी महिन्यापासून कणकवली पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल दत्तू जाधव यांची अवघ्या सहा महिन्यातच रायगड जिल्हयात बदली झाली आहे. कणकवली पोलिस स्टेशन येथे अद्याप नवीन प्रभारी पोलिस निरीक्षक देण्यात आलेले नाहीत. गेल्या दोन वर्षापासून कणकवली पोलिस स्टेशनला कायमस्वरूपी किमान तीन वर्षांसाठी पोलिस निरीक्षक मिळालेले नाहीत.

वर्षभरापूर्वी कणकवली पोलिस स्टेशनच्या निरीक्षकपदी सचिन हुंदळेकर हे अधिकारी होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यभार सांभाळला होता. अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणले होते. मोठ्या जुगार अड्यांवर त्यांनी छापे टाकले होते. मात्र त्यांचीही कारकिर्द अल्पच ठरली. त्यानंतर कणकवली पोलिस स्टेशनच्या निरीक्षक पदी श्री. हुलावळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनाही दोन – चार महिन्याचाच कालावधी मिळाला. कणकवली सारख्या संवेदनशील आणि मोठ्या तालुक्याच्या पोलिस निरीक्षक पदी किमान या पुढे तरी दिर्घकाळ राहणारा पोलिस निरीक्षक मिळणार का? याची उत्सुकता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा