You are currently viewing गगनभरारी

गगनभरारी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ.निलांबरी गानू यांची काव्यरचना

स्त्रीशक्तीचे अंगार ते
परसात फुललेले.
स्त्रीमुक्तीचे निशाण ही
अस्तित्वास भुललेले.

नार गलिच्छ रुढींच्या
शृंखलांना उखडते
क्रूर कुलूप बेड्यांची
बंधनेही झुगारते.

अंधारात प्रकाशाने
झेप आहे घेतलेली
परी नर पंज्यामध्ये
अस्मिताच ठेचलेली.

खांदा लावून खांद्यास
नार हवी शिकायला
परी हवी बंधनात
नरापुढे झुकायला.

दिव्य मातृत्व वैभव
क्षण आनंदाचे येती
भृणहत्या लावी नख
सुख हिरावून नेती.

कर्म कर्तृत्वाची गाथा
अजूनही विळख्यात
भोगदासी हवी नरा
राहो पुरूषी विश्वात.

आले गेले युग तरी
वस्त्रहीन होते नारी
वासनेच्या पंज्यामध्ये
दुःख दैन्य सुरू वारी.

*निलांबरी गानू*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =