ओसरगाव बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार
ओसरगाव :
ओसरगाव बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी परीक्षेत चमकदार यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष श्री अवधूत मालणकर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये दहावीत प्रथम क्रमांक पटकावणारे गणेश शिंदे (बोर्डवे), द्वितीय क्रमांक मिळवणारी स्वानंदी कदम (मळीवाडी, ओसरगाव) तसेच तृतीय क्रमांकाची मानकरी सृष्टी सावंत (खासकीलवाडी, ओसरगाव) यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी संचालक श्री सखाराम येनडे, श्री चंद्रहास उर्फ बबली राणे, मुख्याध्यापक ठाकूर सर तसेच विद्यार्थ्यांचे नातेवाईक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी संस्थेचे अध्यक्ष श्री अवधूत मालणकर आणि संचालक मंडळ यांनी घरी येऊन सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले.
