You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यात १० ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी २१ डिसेंबरला पोटनिवडणूक – प्रवीण लोकरे 

वेंगुर्ले तालुक्यात १० ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी २१ डिसेंबरला पोटनिवडणूक – प्रवीण लोकरे 

संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील ११ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली.

तालुक्यातील अणसूर, पाल, केळूस, खानोली, दाभोली, मोचेमाड, मेंढा, उभादांडा, भोगवे या नऊ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या प्रत्येकी १ जागेसाठी आणि असोली येथील रिक्त असलेल्या २ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर कालावधी, नामनिर्देशनपत्र छाननी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तर ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम वेळ आहे. आणि याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी मतदान घेणे आवश्यक असेल तेथे २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा