माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर; २७ गावांचा संपर्क तुटला…

माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर; २७ गावांचा संपर्क तुटला…

कुडाळ

गेले दोन-तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला दुथडी भरून वाहत असून पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे.दरम्यान नदीला पूर आल्यामुळे तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला आहे.त्यामुळे परिसरातील अनेकांची मोठी गैरसोय झाली आहे.

काल दुपारपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे.त्यामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला असून अनेक कॉजवे पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला असून परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.तर भात शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे.दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा