You are currently viewing तेर्सेबाबर्डे येथील बंद केलेला मिडलकट तोडण्याचा प्रयत्न केल्यास हॉटेल परवाना रद्द करण्याची मागणी करणार – भास्कर परब

तेर्सेबाबर्डे येथील बंद केलेला मिडलकट तोडण्याचा प्रयत्न केल्यास हॉटेल परवाना रद्द करण्याची मागणी करणार – भास्कर परब

 

तेर्सेबाबर्डे साईप्रसाद हॉटेल समोरचा धोकादायक मिडल कट बंद करून अपघातापासून प्रवासी जनतेचे संरक्षण व्हावे या शुद्ध हेतुने मिडल कट बंद करण्यासाठी मी स्वतः नॅशनल हायवेचे अधिकारी कुडाळ पोलिस निरीक्षक श्री. मेंगडे यांच्या जवळ तक्रार केल्यानंतर साईप्रसाद हॉटेल मालक व माझी एकत्र बैठक पीआय मेंगडे पोलिस निरीक्षक कुडाळ यांनी घेतली व यापुढे मिडलकट तोडायचा नाही. आणी जर तोडला तर हॉटेल परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असे कुडाळ पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी सांगितले होते.

असे असतानाही हॉटेलचे मालक आपली माणस माझ्या कडे पाठवून मिडलकट ओपन करण्याची मागणी करतात,फोन करून त्रास देतात,हे कुठेतरी थांबायला हवे यासाठी मी उद्या सकाळी कुडाळ पोलिस निरीक्षक मेंगडे साहेबांच्या ही बाब निदर्शनास आणून देणार आहे.

*जबरदस्तीने मिडलकट तोडल्यास हॉटेल परवाना रद्द करण्याची मागणी करणार*

स्वतःच्या व्यवसायाच्या फायद्यासाठी आणि जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न जर कुणाच्या राजकीय वशिलेबाजी तून साईप्रसाद हॉटेल समोरील मिडलकट तोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर हॉटेलचा परवाना कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करणार,वेळ प्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करणार मात्र कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही,यापुढे हॉटेल साई प्रसाद समोरील मिडलकट ओपन करण्याची जबाबदारी कोणीही घेतली तरी आमचा विरोध राहील, मात्र आमचा विरोध हॉटेल व्यवसायाला नसून प्रवासी जनतेच्या संरक्षणासाठी घेतलेला निर्णयआहे,असे तेर्सेबाबर्डे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे साईप्रसाद हॉटेल मालकाने आपला व्यवसाय वाचविण्यासाठी मिडल कट तोडण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार जशास तसे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देऊ असा इशारा देत आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा