You are currently viewing कणकवली येथील भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उपरकर कुटुंबियांन तर्फे

कणकवली येथील भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उपरकर कुटुंबियांन तर्फे

कणकवली :

यंदाचा श्री भवानी देवी चा त्रैवार्षिक गोंधळ ५ फेब्रुवारीला समस्त उपरकर कुटुंबीयांतर्फे कणकवली येथील तेली आळी येथे होणार आहे. त्यानिमित्त दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा तसेच आरोह इंटरटेनमेंट प्रस्तुत आदर्श संगीत विद्यालयाचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. या कार्यक्रमात झी मराठीवरील सारेगमप फेम गणेश मेस्त्री गायन करणार असून मानसी गोसावी ,वर्षा दरपे यांचे नृत्याचे कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना संगीत साद म्हणून किरण यादव,धनंजय मोसमकर,अश्विनी जाधव,अक्षय कांबळे,शेखर सर्पे,संदीप पेंडूरकर देणार आहेत. मिमिक्री आर्टिस्ट म्हणून विलास पांचाळ ही असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =