जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा माहे जुलै 2025 च्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. याची सर्व जिल्ह्यातील शाळांनी नोंद घ्यावी तसेच जे संघ सुब्रोता मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा सर्व शाळांनी, संघानी सहभागीपुर्वी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडु तसेच संघानी नोंदणी करण्याचे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
राष्ट्रीय सुब्रोता मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत सहभागी संघानी रु. 2000/- प्रवेश फी भरलेल्या नोंदणीकृत संघानाच या स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येईल. सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी जन्मदाखला, आधारकार्ड व पासपोर्ट (सर्व मूळ प्रतीत) सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये एखाद्या खेळाडू अधिक वयाचा आढळून आल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडू अधिक वयाचा नसल्याची संपूर्ण खात्री संबंधित शाळा, विद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी काळजीपूर्वक खात्री करावी. तरी सर्व सहभागी शाळांनी आपले संघ तयार करुन ठेवावेत वरील प्रमाणे नमूद सूचनेनुसार सहभागी होणाऱ्या शाळांनी कार्यवाही करावी. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभागी घ्यावे.
सुब्रोता मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली व्दारा सन 2025-26 या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या 64 वी आंतरराष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल (सबज्युनिअर, ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा आयोजित होणार आहेत. या स्पर्धा 15 वर्षा खालील मुले (सब ज्युनिअर) व 17 वर्ष खालील मुले व मुली (ज्युनिअर) या वयोगटाच्या आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
15 वर्षालीखील मुले (सबज्युनिअर) जन्मतारीख 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला आसावा. 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनिअर) जन्मतारीख दि. 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.