You are currently viewing खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी घेतली ना. अजित पवार यांची भेट

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी घेतली ना. अजित पवार यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर झाली चर्चा

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी आज वित्त व नियोजन मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. चांदा ते बांदा योजनेतील जे प्रलंबित प्रस्ताव आहेत ते मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कोविडमुळे रखडलेली सिंधुरत्न योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. कोकणातील नदयांमध्ये साचलेला गाळ काढून नद्यांचे खोलीकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांवर ना. अजित पवार यांनी सविस्तर चर्चा करत मागण्या पूर्ण करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच चांदा ते बांदा योजनेतील जे प्रलंबित प्रस्ताव आहेत ते तात्काळ मागविण्याचे आदेश त्यांनी दिले. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा