You are currently viewing संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते इन्सुली वासीयांना उद्या नौका सुपूर्त

संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते इन्सुली वासीयांना उद्या नौका सुपूर्त

सावंतवाडी
संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे या बुधवार दिनांक १७ रोजी सिंधुदुर्ग नियोजीत दौर्यावर येत आहे.सायंकाळी ६:३० वाजता इन्सुली सोहिरोबानाथ येथे येणार आहेत. पावसाळ्यामध्ये आलेल्या फुरामध्ये बांदा, इन्सुली, विलवडे, सरमळे, ओटवणे येथे झालेल्या नूकसानीची पहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमीत सामंत आले असता त्यांनी बांदा, इन्सुली वासीयांना लाईफ जॅकेट, सायरन, नौका देण्याचे आश्वासन दिले होते.यापूर्वी लाईफ जॅकेट , सायरन व बांद्याला नौका देऊन आश्वासनाची पूर्तता केली आहे.इन्सुली वासीयांना सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते उद्या बुबवार दिनांक १७ रोजी सायंकाळी नौका सुपूर्त करण्यात येणार आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष अमीत सामंत सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी उपस्थित रहाणार आहेत.आघाडीच्या सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा