You are currently viewing सार्वजनिक बांधकाम विभागाने मनसेला सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग व कुडाळ रस्ते 31 डिसेंबर पर्यंत खड्डे मुक्त होणार अशी दिली डेडलाईन

सार्वजनिक बांधकाम विभागाने मनसेला सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग व कुडाळ रस्ते 31 डिसेंबर पर्यंत खड्डे मुक्त होणार अशी दिली डेडलाईन

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची आज भेट घेतली. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ या संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच सावंतवाडी बांदा दोडामार्ग रस्त्या संदर्भात ठेकेदारांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही विनामोबदला खड्डे भरणार परंतु त्यातील काही ठेकेदाराने इन्सुली पर्यंतचे काही काम हॉटमिक्स चे केले होते. आणि ते पावसाने वाहून गेले ते त्याने केले पाहिजे परंतु पत्रकार घेऊन अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे. आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी आहात त्यामुळे आपला धाक या ठेकेदारांवर ठेवा. जिल्ह्यात काम करत असताना सर्व ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवा. ज्या ठिकाणी ठेकेदार काम करत असताना दिरंगाई करत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. असे परब यांनी सांगितले तसेच कुडाळ- मालवण रस्त्या ते काम सुरू झाले असून लवकरात लवकर टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन श्रीमती जाधव यांनी दिले.

तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी इन्सुली घाटीतील काही खड्डे शिल्लक आहे ते भरा व त्या ठिकाणी हॉटमिक्स डांबराने रस्ता पूर्ण करा तसेच इन्सुली चर्च या ठिकाणी वारंवार खड्डे पडतात त्यावरही योग्य ते उपाय योजना करा. जेणेकरून वारंवार या ठिकाणी प्रवाशांचे जे कंबरडे मोडते ते तरी निदान व्यवस्थित होईल .त्याप्रमाणे शेरले कापईवाडी या ठिकाणी चा ३०० मीटर चा रस्ता हा पूर्णपणे नूतनीकरण करण्यात यावा. दक्षिण पंढरपूर समजली जाणारी श्रीदेवी सोनुर्ली ची जत्रा २० नोव्हेंबरला असून त्या रस्त्यावर आलेली झाडेझुडपे व पडलेले खड्डे भरून काढा. बांदा- शिरोडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत ते भरा , मडुरा- सातोसे- कवठणी- किनळे रस्ता धोकादायक असून त्याचीही डागडुजी करा .

त्याचप्रमाणे उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ यांनी मळगाव घाटीतील अपूर्ण राहिलेला रस्ता पूर्णा व सुस्थितीत करा अशी मागणी केली .यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी जिल्ह्यातील रस्ते पूर्णपणे खड्डेमय झालेले आहे. रस्ते नवीन करूनही त्या ठिकाणी जर वारंवार खड्डे पडत असतील तर आपले प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत .असा आरोपही केला. हाॅटमिक्स प्लॅन्ट वाले ठेकेदार माॅनोपाॅलि ने वागतात. हम कर सो कायदा ,आमच कोण काय करु शकत नाही.अस त्यांना वाटत या मुळे कामाची क्वॉलिटी घसरते, असे प्रकार जर आमच्या निदर्शनास आले तर आम्ही ठेकेदाराला व आपणास जशास तसे उत्तर देऊ. असा इशाराही त्यांनी दिला तसेच आपण या ठिकाणी एक महिला अधिकारी म्हणून काम करत असताना या जिल्ह्यात आपले नावलौकिक राहावे व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील रस्ते दर्जेदार उत्तम प्रकारे व्हावे एवढीच आमची आपणास विनंती आहे.

कार्यकारी अभियंता श्रीमती अनामिका जाधव यांनी ३१ डिसेंबर पर्यंत माझ्या विभागातील सर्व रस्ते हे खड्डेमुक्त केले जातील.. आमचा प्रयत्न होता ३० नोव्हेंबर पर्यंत रस्ते खड्डे मुक्त होणार परंतु पाऊस ठेकेदारांची माणसे ही वेळेत उपलब्ध नसल्यामुळे जरा उशीर झाला. बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध आहे परंतु तो निधी 100% नसला तरी टप्प्याटप्प्याने निधी येत आहे. तस तशी कामे सर्वांना विश्वासात घेऊन केली जातील असे. आश्वासनही श्रीमती जाधव यांनी दिले. यावेळीसार्वजनिक बांधकाम विभागाची मनसेला सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग व कुडाळ रस्ते ३१ डिसेंबर पर्यंत खड्डे मुक्त होणार अशी डेडलाईन कार्यकारी अभियंता श्रीमती अनामिका जाधव यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

यावेळी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष अॅड अनिल केसरकर, तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, प्रकाश साटेलकर, मळगाव शाखाध्यक्ष राकेश परब, नेमळे शाखाध्यक्ष बाबुराव राऊळ, व्येते शाखाध्यक्ष महादेव पेडणेकर, निरवडे शाखाध्यक्ष प्रशांत निरवडेकर, सिद्धांत बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 10 =