You are currently viewing महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई आयोजित ऑनलाईन भक्ती गीत गायन स्पर्धेत कु.ऋचा पिळणकर हिचे यशस्वी पाऊल

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई आयोजित ऑनलाईन भक्ती गीत गायन स्पर्धेत कु.ऋचा पिळणकर हिचे यशस्वी पाऊल

माणगाव

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन,मुंबई आयोजित ऑनलाईन भक्ती गीत गायन स्पर्धा नुकतीच सम्पन्न झाली. या स्पर्धेत ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत श्री. वा. स. विद्यालय, माणगाव या शाळेची कु. ऋचा संजय पिळणकर हिने इयत्ता पाचवी ते आठवी या गटामध्ये उत्तेजनार्थ मिळवत यश संपादन केले.तीला तिच्याच भावंडानी म्हणजेच हार्मोनियमसाठी कु. पल्लवी व तबला साठी कु.अथर्व पिळणकर यांनी उत्तम अशी संगीत साथ केली. या सर्वांचे त्यांचे वडील माणगाव प्रशालेचे श्री. संजय पिळणकर सर यांनी तसेच सर्व शिक्षक व नातेवाईकांनी कौतुक तिचे केले.व तीला भविष्यात अश्याच प्रकारे अजून चांगले यश संपादन करण्यास शुभेच्छा व आशीर्वाद पण दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + twenty =