You are currently viewing वैभववाडी स्थानक परिसरात रेल्वेच्या धडकेत कणकवलीतील तरुण ठार

वैभववाडी स्थानक परिसरात रेल्वेच्या धडकेत कणकवलीतील तरुण ठार

वैभववाडी

रेल्वेची धडक बसल्यामुळे कणकवली येथील युवकाचे वैभववाडी रेल्वे स्टेशन नजीक निधन झाले. त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. शैलेश मधुकर कुडाळकर (वय ४५) असे त्याचे नाव आहे. याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईवरुन मडगावच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सेप्रेसच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती वैभववाडी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक एस.एस.खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, अभिजीत तावडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वैभववाडी रेल्वे स्टेशनपासुन राजापूरच्या दिशेला ४०० मिटर अंतरावर रेल्वे रुळावर छन्नविच्छन अवस्थेत शैलेशचा मृतदेह पडला होता. मृतदेहाच्या बाजूला त्याचे पाकीट व मोबाईल पडलेला होता. पाकिटातील कागदपञावर असलेल्या नाव व पत्त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. दरम्यान शैलेशच्या मोबाईलवर त्याच्या मिञाचा फोन आला. त्यालाही पोलिसांनी याबाबत माहीती देली. तासभरानंतर मयत शैलेश चा भाऊ संतोष कुडाळकर हे घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह शैलेश कुडाळकरचाच असल्याची ओळख पटविली. मयत शैलेश कुडाळकर हा सकाळी कणकवली येथून दिवा गाडीने वैभववाडी रेल्वे स्थानकात आला होता. त्याचा रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली याचा तपास सुरु आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यातआला.
मृत शैलेश कणकवली शहरात एका सुवर्णकाराकडे काम करीत होता. स्वभावाने मनमिळावू, शांत, मितभाषी होता. त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच कणकवली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, विवाहीत बहिण असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा