You are currently viewing वैभववाडी पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार…

वैभववाडी पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार…

वैभववाडी

महा आवास अभियान–ग्रामीण २०२१ अंतर्गत विभागस्तरावर सर्वोत्कृष्ट पंचायत समिती तृतीय क्रमांकांचा पुरस्कार वैभववाडी पंचायत समितीला मिळाला आहे.नुकताच हा पुरस्कार विभागीय आयुक्त, (कोकण विभाग) विलास पाटील यांच्या हस्ते गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जि.प.अध्यक्ष संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उपमुख्य कार्यकारी पराडकर, आदी उपस्थित होते.

महा अवास अभियान ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व्यक्तींना महा आवास अभियान ग्रामीण पुरस्कार देण्यात येतो. केंद्र पुरस्कृत प्रधानमंञी योजना ग्रामीण व राज्य पुरस्कार ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणेसाठी २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राज्यात महाआवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले.या अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंंमलबजावणी व कामगीरीबाबत मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना महा आवास अभियान ग्रामीण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा