You are currently viewing मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सिंधुदुर्गात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सिंधुदुर्गात

मनसैनिकांकडून होणार जल्लोषी स्वागत

वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सनी बागकर यांचे कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष
राजसाहेब ठाकरे यांचा नियोजित दौरा उद्या सावंतवाडीत असणार आहे. स्वागतासाठी वेंगुर्ला तालुक्यातील तमाम मनसैनिकांनी सावंतवाडीत उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुला तालुकाध्यक्ष सनी बागकर यांनी केले आहे. त्यानंतर 1 डिसेंबरला हॉटेल आराध्या कुडाळ सावंतवाडी महामार्ग येथे राज ठाकरे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीला उपास्थित राहावे. तसेच सोबत तालुक्यातील ज्या ज्या पीडित लोकांचे, कामगारांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत त्यांना स्वतः राज ठाकरे भेटतील. तरीही अशा पीडित लोकांनी आपले गा-हाणे राज ठाकरे यांच्या समोर ठेवायला हरकत नाही. कृपया भेटीच्या पूर्वसूचने साठी मनसे पदाधिकाऱ्यांना व वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सनी बागकर यांना संपर्क करावा असे आवाहन बागकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =