You are currently viewing कोविड काळातील योगदानाबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सन्मान

कोविड काळातील योगदानाबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सन्मान

कणकवली रोटरी क्लबच्या वतीने सन्मानपत्र देऊन झाला गौरव

कणकवली

गेल्या दोन वर्षात कोरोना काळात झोकून देत काम करून एक जबाबदार नगराध्यक्ष म्हणून जी कामगिरी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून करण्यात आली, त्याचा गौरव कणकवली रोटरी क्लबच्या टीम कडून नुकताच करण्यात आला. नगराध्यक्ष समीर नलावडे यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव कणकवली रोटरी क्लब च्या मार्फत करण्यात आला. या प्रसंगी समीर नलावडे हे उपस्थित नसले तरी त्यांच्या पत्नी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांनी हा सन्मान स्वीकारला.

कणकवलीतील सर्व सामान्य जनते साठी स्वतःच्या जबाबदारीने, आणि कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कोविड सेंटरची उभारणी करून कोविड सारख्या जगभर असलेल्या महामारी च्या काळात समाजासाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल कणकवली रोटरी क्लब च्या वतीने हा सन्मान करण्यात आला. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली नगरपंचायत च्या वतीने करण्यात आलेल्या कोविड सेंटर चा लाभ जिल्हाभरातील कोविड रुग्णांनी घेतला. अनेक रुग्णांनी उपचाराकरिता या कोविड सेंटरला पसंती दिली आहे. सुरुवातीच्या काळात तर या सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णांची वेटिंग लिस्ट लागली जात असे. दर्जेदार सेवा व उत्कृष्ट नियोजन यामुळे या कार्याची दखल घेत कणकवली रोटरी क्लब च्या वतीने समीर नलावडे यांचा सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − one =