You are currently viewing शिवसेना – शिंदे गट मालवण तालुकाप्रमुख पदी राजा गावकर यांची निवड

शिवसेना – शिंदे गट मालवण तालुकाप्रमुख पदी राजा गावकर यांची निवड

मालवण :

 

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर मालवणात शिंदे गटाचे बळ वाढले आहे. त्यामुळे शिंदे गटाने मालवण तालुकाप्रमुख पदाची नियुक्ती केली आहे. गुरुवारी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या राजा गावकर यांची तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. गावकर यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली.

राजा गावकर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. दीपक केसरकर यांच्या सोबत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राज्यात शिवसेना शिंदे गटाचा विस्तार होत असताना मालवण तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी राजा गावकर यांच्याकडे देण्यात आली आहे. लवकरच मालवण तालुका कार्यकारणी जाहीर केली जाणार असून मालवण तालुका कार्यालयाचेही उद्घाटन होणार आहे, अशी माहिती राजा गावकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा