You are currently viewing २ फेब्रुवारीला श्री देव उपरलकरचा वार्षिक सोहळा

२ फेब्रुवारीला श्री देव उपरलकरचा वार्षिक सोहळा

सावंतवाडी :

 

महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवार २ फेब्रुवारीला साजरा होणार आहे.

सावंतवाडीतील राज घराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. यावर्षीही त्यानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार २ फेब्रुवारीला सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तीर्थप्रसाद, नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 6 =