You are currently viewing माडखोल धरणात युवक बुडाला – शोधकार्य सुरु 

माडखोल धरणात युवक बुडाला – शोधकार्य सुरु 

तहसिलदार राजाराम म्हात्रे घटनास्थळी

सावंतवाडी

माडखोल धरणात पोहण्यासाठी गेलेला १८ वर्षीय युवक बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली होती. अर्जुन विश्राम पाताडे (वय १८ रा. खासकीलवाडा) असे त्याचे नाव आहे. तर त्याचे अन्य दोघे साथीदार सुखरूप होते. सायंकाळी शोधकार्य घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अर्जुन हा त्याचे मित्र तेजस राऊळ आणि संकेत कामतेकर (दोघे रा. सावंतवाडी ) यांच्यासोबत बुधवारी सकाळी अकरा वाजता पार्टी करण्यासाठी दुचाकीने माडखोल धरण परिसरात गेला होता. त्या ठिकाणी दुपारचे जेवण झाल्यानंतर तिघांनीही पाण्यात पोहण्याचा निर्णय घेतला आणि ते पाण्यात उतरले मात्र, अर्जुनला पोहता येत नसल्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने काही वेळाने तो दिसेनासा झाला.

हा प्रकार लक्षात येताच दोन्ही मित्रांनी त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सापडून आला नाही. याबाबत पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. मात्र सायंकाळी अंधार असल्यामुळे शोधमोहीम राबवता आली नाही या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासूनच शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह पोलिस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ शोधकार्यात सहभागी झाले आहेत. तर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =