You are currently viewing एस.टी कर्मचा-याच्या संपास शिक्षक भारती सिंधुदुर्गचा जाहिर पाठिंबा

एस.टी कर्मचा-याच्या संपास शिक्षक भारती सिंधुदुर्गचा जाहिर पाठिंबा

तळेरे

शिक्षक भारती माध्यमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग या शासन मान्यताप्राप्त व जिल्ह्यात सर्वात आक्रमक व बलाढ्य असलेली शिक्षक भारती माध्यमिक संघटनेच्यावतीने एसटी कर्मचारी संपास जाहीर पाठिंबा कुडाळ, येथे उपस्थित राहून व लेखी पत्राद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळ शासकिय सेवेत विलीनीकरण करण्यासाठी संपूर्ण राज्यात बेमुदत संप सुरु आहे. या पत्रात शिक्षक भारतीने म्हटले आहे की,आपल्या मागण्या रास्त आहेत, याची दखल शासन स्तरावर लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.
उद्या दि. 11 नोव्हेंबर 2021 पासून दिवाळी सुट्टी संपून माध्यमिक शाळा सुरू होत आहेत.एसटी ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची, शेतक-यांची व सर्व सामान्य जनतेची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते आणि या जीवनदायनीत काम करणारे कर्मचारी कित्येक वर्ष आपल्या मागण्या शासन स्तरावर मांडत आहेत परंतु अद्याप त्याची दखल शासनाने घेतलेली नाही.
त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न शासनाने सहानुभूती पुर्वक विचार करून त्वरित सोडवावा व उद्यापासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एसटीतून कसे जातील यासाठी शासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावा. त्यासाठी लवकरात लवकर या कर्मचारी संघटनांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीने केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पातळीवरील तमाम शिक्षक भारती संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व शिलेदार,सर्व सभासद आपल्या संघटनेच्या पुकारलेल्या संपास जाहीर पाठिंबा देत आहोत,अशा आशयाचे पत्र शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह तथा जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर , राज्य प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण,कुडाळ तालुका अध्यक्ष माणिक पवार,सचिव सुशीलकुमार कडुलकर, पदाधिकारी अनिकेत वेतुरेकर अन्य जिल्हा व तालुका पदाधिकार-यांना कुडाळ येथील आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

कुडाळ:-एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा दर्शवत असल्याचे पत्र आंदोलनकर्त्यांना शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर देत पाठिंबा दर्शविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =