You are currently viewing दीपावली

दीपावली

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ.प्रवीण उर्फ जी आर जोशी यांची काव्यरचना

आयुष्य सुख दुःखाचे
पावसातील उन्हाचे
दीपावली शिंपित जाई
चांदणे ऋतु बंधाचे

विश्व दीप उजळे
घेऊनी स्निग्ध वात
सहा ऋतूंचे सोहाळे
आयुष्य गीत गात

सौभाग्य नंदादीप
अखंड पुण्य मंदिरी
गर्भ ग्रह तेजाळले
भक्त औक्षण करी

अनादी अनंत परंपरा
आयुष्य सजवुनी जाती
सण कित्येक बहरती
सणांच्या पवित्र ज्योती

©प्रो डॉ जी आर जोशी
अंकली बेळगाव

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − one =