You are currently viewing शेतकऱ्यांचा कृषी सारा गोळा करण्यासाठीच बाजार समिती का? –  सत्यवान चव्हाण यांचा सवाल

शेतकऱ्यांचा कृषी सारा गोळा करण्यासाठीच बाजार समिती का? – सत्यवान चव्हाण यांचा सवाल

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, ती फक्त शेतकऱ्यांचा शेतसारा गोळा करण्यापुरतीच का? असा सवाल ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ता सत्यवान चव्हाण यांनी केला आहे.
स्वातंत्र्याला 72 वर्षे होऊनही शेतकऱ्याचा कृषिमाल व महिला बचत गटांचा कृषिप्रक्रिया माल विक्रीकरिता आपल्या जिल्ह्यामध्ये बाजारपेठ नाही.
आज जिल्ह्यांमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांचे अतिक्रमण सुनियोजित व संघटितपणे प्रचंड वेगाने वाढत आहे. कारण ते संघटित आहेत, उद्या येथील भूमिपुत्र शेतकरी/ व्यापारी उपरा होऊ नये याकरिता तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.
या जिल्ह्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षाकडून शेतकऱ्यांचा/ बचत गटांचा नेहमीच फक्त राजकीय वापर केला जातो, असा आरोप त्यांनी केला.


ही परिस्थिती शेतकरी व बचत गटांना संघटित होऊन बदलावी लागेल, सर्वांनी एकत्रित येऊन जिल्ह्यामध्ये प्रभावी शेतकरी चळवळ उभी करावी लागेल. व जिल्ह्याची राजकीय व्यवस्था बदलावी लागेल
गाव तिथे किसान मोर्चा” या माध्यमातून शेतकरी व महिला बचत गटातील कार्यकर्त्यांना शेतकरी चळवळी मध्ये सक्रिय होण्याची आवश्यकता आहे.
असा ठराव ओरस येथील शेतकरी व बचत गटातील ज्येष्ठ शेतकरी नेते सत्यवान चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मंजूर झाला आहे.

या बैठकीस पंढरी परब, संतोष मोडक, चंद्रकांत चव्हाण, सहदेव चव्हाण, बाबल नांदोसकर, दिनेश मिस्त्री, विठ्ठल चव्हाण, अजय मयेकर, बाळकृष्ण आंगणे,
सौ. माधवी मिठबावकर, सौ सावित्री चव्हाण, सौ वैभवी चव्हाण, सौ मानसी चव्हाण, आदी प्रमुख पुरुष व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =