You are currently viewing तळागाळातील कार्यकर्त्याला भेट देणार, तालुका संघटन सक्षम करणार – मेघनाथ धुरी

तळागाळातील कार्यकर्त्याला भेट देणार, तालुका संघटन सक्षम करणार – मेघनाथ धुरी

मालवण तालुका काँग्रेसची कमिटीची मासिक सभा काल बुधवार दि. २० रोजी सकाळी ११ वाजता वायरी येथे घेण्यात आली

मालवण तालुका निरीक्षक इर्षाद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा घेण्यात आली
यावेळी गेल्या ६५ वर्षातील काँग्रेस पक्षाच काम आजच्या तरुण वर्गाला समजावून सांगण्यासाठी युवक कार्यकर्त्यांना इर्शाद शेख यांनी मार्गदर्शन केलं

तसेच गावागावात जाऊन बूथ निहाय असलेले जुने काँग्रेस कार्यकर्ते जेष्ठ पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन त्या त्या ठिकाणी बूथ कमिटी बनविण्यासाठी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांनी सूचना करून तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी यासोबत आप्पा चव्हाण, अरविंद मोंडकर, महेंद्र मांजरेकर, संदेश कोयंडे, सतीश कदम, जेम्स फर्नांडिस यांची समन्वय समिती बनविण्यात आली

येत्या दिवाळीच्या दरम्यान ग्रामीण भागातील जुन्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेट देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ कमिट्या बनवाव्यात अशी सूचना इर्शाद शेख यांनी केली

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी देखील महिलांच्या उत्कर्षासाठी खाद्य पदार्थांची विक्रीसाठी स्टॉल व बचतगट, मासेविक्री करणाऱ्या महिलांच्या माध्यमातून छोटे व्यवसाय निर्माण करून देण्यासाठी महिलांना आर्थिक ताकद देण्यासाठी प्रयत्न करूया व त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिलाध्यक्षा सौ. संध्याताई सव्वालाखे यांचा मेळावा देखील मालवण मध्ये भरवूया असे सांगितले

तर तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी यांसारख्या सक्षम अध्यक्षाना आपण पूर्ण वेळ देऊन तालुका पिंजून काढत ग्रामीण भागातील युवकांना देखील पक्षात घेऊन त्यांना त्यांच हक्काचं व्यवसायाईक मार्गदर्शन भविष्यात रोजगार निर्मितीच व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं अभिवचन जिल्हा युवक प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी दिलं

कार्यकर्ता असला तरच पदाधिकारी आहेत आणि पदाधिकारी असले तरच नेते आहेत त्यामुळे सर्वानी एकत्र येऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अस जेष्ठ कार्यकर्ते आप्पा चव्हाण यांनी आपली भावना व्यक्त केली

तर येत्या मालवण नगरपरिषद निवडणूक मध्ये ५०% तरुणांना संधी द्या आम्ही अर्ध्या अधिक सीट निवडून आणणारच अस युवक शहराध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी निरीक्षक इर्षाद शेख यां समोर आपलं मत व्यक्त केलं

सदर सभा सूत्रसंचालन महेंद्र मांजरेकर तर आभार अरविंद मोंडकर यांनी मानले

यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, निरीक्षक इर्शाद शेख, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, आप्पा चव्हाण, सतीश कदम, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, समीर वंजारी, हेमंत कांदळकर, लक्ष्मीकांत परुळेकर, हेमंत माळकर, मधुकर लुडबे, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुर्ले, युवक तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, युवक शहराध्यक्ष गणेश पाडगावकर, बाबा मेडिस, श्रेयस माणगांवकर, ममता तळगावकर, हर्षदा पाटील, संगीता शिरवडेकर, प्रणित बिलये, मिनीन फर्नांडिस,
व इतर पदाधिकारी उपस्थित होते

 

प्रतिक्रिया व्यक्त करा