You are currently viewing झाराप येथे जिल्हा कायदेविषयक कार्यक्रम

झाराप येथे जिल्हा कायदेविषयक कार्यक्रम

कुडाळ :

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने १७.१०.२०२१ रोजी झाराप येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश मा. श्री हांडे साहेब, जिल्हा विधी प्राधिकरण सचिव मा. श्री. म्हालटकर साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन झाराप चे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. आळवे यांनी केले.

श्री म्हालटकर यांनी पोक्सो कायदा ,सायबर हॅक ,बँकिंग फ्रॉड हे गुन्हे कसे घडतात याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यांच निवारण केले. श्री हांडे यांनी गुन्हे रोखण्यासाठी उपाय योजना ग्रामस्थांना समजाऊन सांगितल्या. तसेच बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार या महत्वाच्या विषयावर चर्चा केली. गावच्या सरपंच सौ. स्वाती राजेंद्र प्रभुतेंडोलकर यांनी दोन्ही पाहुण्यांचे स्वागत आभार मानले.

या कार्यक्रमासाठी गावचे उपसरपंच श्री.अजित मांजरेकर, सदस्य श्री. यनेश गोडे, श्री बशीर खान, सौ. पेंडूरकर, सौ. हरमलकर, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + sixteen =