You are currently viewing राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दारू वाहतूक प्रकरणी मालवण येथील एकाला घेतले ताब्यात

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दारू वाहतूक प्रकरणी मालवण येथील एकाला घेतले ताब्यात

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दारू वाहतूक प्रकरणी मालवण येथील एकाला घेतले ताब्यात

दारुसह गाडी मिळून ९१ लाखाचा मुद्देमाल जप्त…

बांदा

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मालवण येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ७९ लाखाच्या दारुसह १२ लाखाची गाडी असा मिळून तब्बल ९१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे इन्सुली तपासणी नाका येथे करण्यात आली. अरूण लक्ष्मण मिठबांवकर (वय ४८, रा. बांदिवडे बुद्रुक- मालवण) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील संशयित हा बेकायदा गोवा बनावटीची दारू घेवून येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला अज्ञाताकडून देण्यात आली होती. त्यानुसार इन्सुली तपासणी नाका येथे गाडीची तपासणी केली असता गाडीत हा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोज शेवरे, निरीक्षक, संजय मोहिते,तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक, प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक, गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक, दिपक वायदंडे, जवान आदींनी केली. याबाबतचा अधिक तपास निरीक्षक संजय मोहिते करीत आहेत.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://www.facebook.com/share/p/aHUypmmwKiMeH3eA/?mibextid=oFDknk

https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 10 =