You are currently viewing ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी

लेख सादर: अहमद नबिलाल मुंडे

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1985 त्या खाली तयार करण्यात आलेल्या नियमानुसार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचेमार्फत राबविण्यात येणारया शासनाच्या विविध योजना राबविण्याचा अधिकार सहज आणि सोप्या लोकांचा वेळ आणि पैसा वाचावा असे नियोजन करण्याचा अधिकार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचेसाठी शासनाने कार्य सूची घालून दिली आहे
प्रशासन
1/ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1985 व त्याखाली शासनाने वेळोवेळी तयार केलेल्या नियमानुसार व आदेशानुसार ग्रामपंचायतीचा सचिव या नात्याने कार्य करणे बंधनकारक आहे
2/ ग्रामपंचायतीकडील सर्व प्रकारचें अभिलेख जतन करणे सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे कोणताही पक्षपात न करता व सर्वसामान्य माणसाला कोणताही त्रास होईल असं वर्तन न करता पार पाडणे
3/नरेगा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीचे अभिलेख वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेवून अद्यावत करणे. उदा. घरपट्टी पाणीपट्टी वसुली. विविध कर वसूली.
4/ पंचायतीने ठरवून दिल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1985 कलम 7नुसार ग्रामसभा. मासिक सभा बोलविणे. त्यांची नोटीस काढून संबंधितांना देणें. सभेच्या कार्यवृत लिहिणे व सभेमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व पुरतता करणे. हे काम पंचायतीच्या सहकार्याने करावे वर्षभर किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. ग्रामसभेला गावांतील कोणालाही हजर राहता येईल. सभेमध्ये बोलण्याचा व आपले मत मांडण्याचा अधिकार असेल
5/ शासनाने व जिल्हा परिषद बसविलेले विविध कर वसूली करण्याबाबत आदेश सचिवाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कर व फी यांची वसुली करणे. प्रत्त्येक चार वर्षांनी करांची आकारणी करून 25*टक्के वाढ सुचविणे कोणत्याही ग्रामपंचायती ने जर चार वर्षाने आपल्या गावात कोणतीही मालमत्ता वाढ झाली आहे त्याचा लेखाजोखा जर जिल्हा परिषद यांचेकडे कळविला नाहीतर आपणांस एकदम वाढीव घरफाळा पानपट्टी असे विविध कर वाढून येतात त्याला सर्वस्व ग्रामसेवक जबाबदार असतात कारणं यांनी आपल्या कामात कसूर केल्यामुळे त्याचा दंड सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतो
6/ ग्रामपयतीकडील लेखा परिक्षण केलेल्या आक्षेपाची पूर्तता करणे व लेखा परीक्षण दर्शविलेल्या अनियमितचे व आक्षेपाचे पुनरावृत्ती न होण्याबाबत दक्षता घेणं
7/ ग्रामपंचायत हद्दीतील जमीन. रस्ते इमारती पडसर. जागा. देवस्थान जमीन. गायरान जमीन. स्मशानभूमी. मंदिरे. व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्ययावत ठेवणे. सनदी अभिलेख अद्ययावत ठेवणे व ग्रामदरशक नकाशे तयार करणे व ते पाहण्यासाठी विनामोबदला नियोजन करणे
8/ जन्म मृत्यू. उपजत मृत्यू. विवाह नोदी. इत्यादी बाबत स्वतंत्र रजिस्टर अॅकटनुसार निबंधक म्हणून कर्तव्य पार पाडतील. यासाठी शिपाई यांना आदेश देण्याचे अधिकार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना आहेत
9/ ग्रामपंचायत क्षेत्रातील पंचायत सभासदांच्या सहकार्याने ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेले सहकारी सोसायट्या दुध डेअरी. नागरी पतसंस्था. स्थानिक मंडळे. महिला मंडळे. महिला बचत गट. बालवाडी. अंगणवाडी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शाळा. स्वयंसेवी संस्था. यांच्याशी समन्वय साधून या सर्व संस्था लोकोपयोगी कार्यक्रम बनविण्याचे दृष्टीने प्रयत्न करणे यासाठी जनसंपर्क. मेळावे. गृहभेट देऊन सर्व सापेक्ष पणे राबविणे
10/ग्रामपंचायतीच्या पातळीवर शासकीय. निमशासकीय कर्मचा-यांना आठवड्यातून किमान एक दिवस ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आणून ग्रामपंचायतीच्या प्रश्नांनी सोडवणूक करण्याच्या दृष्टीने समन्वय साधून आवश्यक ती कारवाई करणे
11/ सरपंच. उपसरपंच. यांना सभेच्या वेळी व आवश्यकता असेल तेव्हा कायदेशीर सल्ला देवून आवश्यक असल्यास आपली मतें नोंदविण्याचा अधिकार आहे
12/ ग्रामपंचायत काही नियमांची व कायद्याची उल्लंघन करणारी कृती करीत असेल तर किंवा तसे करावयाचे ठरविले असल्यास त्याबाबत अहवाल मुख्य अधिकारी /गटविकास अधिकारी यांना विहित मुदतीत सादर करणे आपणास सुध्दा ग्रामपंचायत कार्याबद्दल शंका काही चूक असल्यास गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार करता येते
13/ ग्रामपंचायतीने वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून पंचायत समितीस विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे
14/ निवडणुकांसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व आदेश यांचें काटेकोर पालन करणे. कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा किंवा प्रचार करण्याचा ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना अधिकार नाही असे झाल्यास कायद्याचे उल्लंघन होणारी घटना आहे यांचेवर कायदेशीर कारवाई होते
15/ ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी नियंत्रण व त्यांच्याकडून वसूली करण्याची जबाबदारी पार पाडणे त्याची आस्थापना विषयक बाबी उदा. सेवा पुस्तक. वैयक्तिक नसत्या. परिपूर्ण ठेवणें. रजेचा हिशेब. भविष्य निर्वाह निधी. बोनस इ. शासन आदेशानुसार व नियमानुसार देणें
16/ सेवा हमी कायद्यानुसार दाखले विहित मुदतीत ठेवणें
17/. ग्रामसेवक यांनी आपल्या मुख्यालयात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे तसा शासन निर्णय सुध्दा आहे. पण कोणताही अधिकारी व कर्मचारी या आदेशांचे पालन करत नाही उलट यांना प्रवास भत्ता हवा आहे जर मुख्यालयात म्हणजे कामाच्या ठिकाणी मुक्कामाची सोय असेलतर तर प्रवास भत्ता कशासाठी पाहिजे. यांनी शासकीय सुट्या सोडून इतर दिवशी आॅफिस मध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे तसेच एका दिवसांपेक्षा जास्त कालावधी साठी ग्रामसेवक गावात येत नसेल तर सदर ग्रामसेवक बद्दल तहसिलदार. प्रांताधिकारी गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करावी
*नियोजन*
1/ ग्रामपंचायतींचे सदस्य. सरपंच व सभासद यांचे सहकार्य घेवून गावांचा विकास करण्याच्या दृष्टीने विकासाच्या पंचवार्षिक आराखडा तयार करणे. पंचवार्षिक नियोजन करणे. रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उधोग धंदे वाढ करणे. पडिक जमीन. लागलडीस योग्य करणे. रस्ते दुरुस्ती. गटर. डांबरीकरण. सांडपाण्याची विल्हेवाट लावणे. परिसर स्वच्छता. पशुधन विकास. वैरण विकास. बाल कल्याण योजना. साक्षरता मोहीम याबाबतीत शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व आदेश यानुसार कार्य करणे. नरेगा व वित्त आयोग योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीचे उत्पन्न व इतर प्रशासकीय व जिल्हा परिषदेकडून उपलब्ध होणारें व अपेक्षित. असलेलें अनुदान यांचा विचार करून ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे
2/ पंचवार्षिक आराखडा तयार करीत असताना ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास योजनेवर लाभार्थी निवडीसह जानेवारी महिन्यात वार्षिक कृती आराखडा तयार करणे एप्रिल /मे मध्ये होणाऱ्या ग्रामसभे पुढे ठेवून वाचन करून ग्रामसभेची मान्यता घेणें
3/ विकास कामांची वर्गवारी एकत्रित माहिती घेऊन योजनावार नोदी वेगवेगळ्या ठेवून ग्रामपंचायत पातळीवर योजनांची अंमलबजावणी सुरळीत पणे होते का नाही यांवर लक्ष ठेवणे
* शेती विषयक*
1/शासनाकडून तसेच जिल्हा परिषद यांचे कडून वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजनांची माहिती प्राप्त करून ती ग्रामसभा/मासिक सभा व इतर सार्वजनिक संस्थांमार्फत पोहचविणे व त्या व बाबतची माहिती ग्रामस्थांना देणें सदर योजनांच्या ग्रामस्थांना लाभ होण्याच्या दृष्टीने पंचायत समिती पातळीवर तांत्रिक अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शन घेऊन सदर योजना राबविणे
2/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे व लोकांचे सर्वेक्षण करणे दर पांच वर्षांनी
3/ पात्र लोकांच्या मागणीनुसार नियमानुसार प्रकरणे तयार करणे. त्यांना मंजुरी घेणे व त्यानुसार खरेदी करून देणे
4/ नरेगा व वित्त आयोग इ योजनांची शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार हाती घ्यावयाच्या कामांचे स्वरूप व पंचायत समितीचे सहायाने नियोजन करणे
5/ ग्रामसभेपुढे कामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवणें
6/ प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सदर प्रस्ताव खातेप्रमुख तांत्रिक अधिकारी यांचेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावे गावात होणारी बांधकामांवर देखरेख ठेवणे. कामांची पाहणी करणे. व त्यांचे मुल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव तांत्रिक अधिकारी यांचेकडे पाठविणे नरेगा योजनेअंतर्गत निर्माण झालेल्या मालमत्तेची नोंदणी नोंदवही मध्ये करणे व त्यावर देखरेख ठेवणे सदर योजनेअंतर्गत जमाखर्चाची माहिती ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त सहीने ग्रामसभेपुढे ठेवणें
*कुटुंब कल्याण कार्यक्रम*
1/ कुटुंब कल्याण कार्यक्रम प्रसार आरोग्य खाते व पंचायत समितीचे सरपंच व सभासद यांच्या सहकार्याने करणे
2/ कुटुंब कार्यक्रमा अंतर्गत शासनाकडून वेळोवेळी नवीन आलेल्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देणें
* कल्याणकारी योजना * महिला बालकल्याण. समाज कल्याण. साक्षरता प्रसार. अंधश्रद्धा निर्मूलन. इ कामे स्थानिक संस्था यांचें सहकार्य घेऊन या योजनांबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे
2/ मोफत कायदेशीर सल्लागार. योजना माहिती. जिल्हा तालुका पातळीवर घेवून ती पंचायत व स्थानिक संस्थांद्वारे पंचायतीपुढे ठेवणे. व ती ग्रामस्थांना करून देणे तसेच या योजनांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करणे
*गाव माहिती केंद्र*
1/ ग्रामपंचायत क्षेत्रात माहिती केंद्राची स्थापना करून दुरदरशन. संच. रेडिओ. व सार्वजनिक वाचनालय यांचे द्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देणें
* पशुसंवर्धन विविध योजना *
1/या योजनांसाठी प्रोत्साहन देणे व संकरित जनावाराचया वाढीस उत्तेजन देणे
* संकीर्ण*
1/ गावाला शुध्द पाणी पुरवठा करून अशा योजना सुस्थितीत ठेवणे. त्याची दुरुस्ती व देखभाल करणं शुध्दीकरण औषधांचा पुरेसा साठा पाणी वाटपाचे नियोजन. देखभाल व दुरुस्तीसाठी होणार या खर्चाइतकी पाणीपट्टी बसविणे. त्याबाबत अहवाल पंचायतीला सादर करणे आणि ह्यावर पंचायतीने केलेल्या कारणांनुसार ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 129 नुसार पाणीपट्टी आणि विशेष पाणी पट्टी. वसुली कारवाई करणे
2/ पुर. दुष्काळात भुकंप. टोळधाड. टंचाई. साथरोग. इ नैसर्गिक आपत्तीत मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत त्वरित संबंधित व कळविणे व ग्रामपंचायतीने आरोग्य खात्याच्या सहहयाने प्राथमिक उपाययोजना करणे
*याशिवाय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व जिल्हा परिषद इतर वरिष्ठ अधिकारी यांनी वरिल कार्यसूचीमधील व त्या व्यतिरिक्त वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे
वरील प्रमाणे सर्व माहिती आपणासाठी उपयुक्त आहे आपण आपले हक्क व अधिकार ओळखा शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या सेवेसाठी आहेत त्यांचा पूरेपूर वापर करून घ्या
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =