You are currently viewing माता महाकाली देवी

माता महाकाली देवी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची काव्यरचना

महाशक्ती महाकाली
शिवशक्ती तू पार्वती
क्षमा शिक्षा तूच देसी
भद्रकाली तूची सती

हाती खड्ग त्रिशूळ
तलवार कंठी मुंडी
रूप काली भयप्रद
चंड संहार करी चंडी

माता कालिका संहारी
दैत्य राक्षस दानव
नसे दानवी वृत्तीस
माते मनी दयाभाव

दक्ष प्रजापती पिता
पतीदेव शिवभोळे
होता क्रोधीत पडले
सती शरीर काळे

सती दावी दहा रुपे
भयभीत होती शिव
रूप विक्राळ कालिका
बोले ना शब्दही देव

अष्टसिद्धी होई प्राप्त
काली साधना करिता
पूर्ण होती सर्व इच्छा
मंत्र कालीचा जपता

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा