*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तृष्णा नाही जीर्ण जाहली..*
जीर्ण जरी जाहलो..
हासत हासत व्योमसागरी पहा आम्ही पोहलो…
संकटांचे कडे कोसळले अभेद्य राहिली मने
पुढे धावलो ध्यास घेऊनी टाकून मागे जुने..
सुखी माणसाचा तो सदरा सांगा मिळाला कुणा
एक मिळाला सदरा पुरे हो असेल जरी तो जुना..
जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणती रामदास
बात मनातील ध्यानी ठेवा असे खूप खास…
हव्यासाची कधी न गाठली पहा परीसीमा
पाठीमागे सदा राहिला धन्यवाद “ रामा”..
नीतिचा तो मार्ग आचरता पडते कधी ना उणे
ऋणानुबंध जपून ठेवती आसुसलेली मने..
सत्य वदावे तेच आचरावे पंथ असे तो नामी
छत्रछाया धरून ठेवतो डोळस आहे स्वामी…
तृष्णा अजूनी नाही शमली पान सदा हरित
मनास नाही वय पहा ना ते सदाच हो तरतरीत…
काव्य प्रसवता नेणिवेतून भाग्यवंत थोर
जाणीवेत मग थुईथुई नाचे मनी पहा मोर..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
