You are currently viewing आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत १३ मे रोजी कुडाळ तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
Oplus_16908288

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत १३ मे रोजी कुडाळ तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

दिवसभरात विविध ठिकाणी कार्यक्रम; जलशुद्धीकरण प्रकल्प, तलाव सुशोभीकरण, पूल, जेटी, बंधारा व शाळा सभामंडपाचे होणार उद्घाटन

कुडाळ :

कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी कुडाळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यात एकाच दिवशी विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहेत. विविध कामांसाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांनी दिली.

दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता नेरूर कलेश्वर मंदिर येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लोकार्पणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता वालावल तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता वालावल येथे नवीन ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण होईल.

दुपारी १२.३० वाजता पाट तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असून दुपारी ३ वाजता निवजे येथे निवजे-आंबेरी रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण करण्यात येईल. सायंकाळी ४ वाजता आणाव पिठढवळ नदीवरील जेटी बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे.

सायंकाळी ५ वाजता कुंदे येथे कसाल-कुंदे-आंब्रड मार्गावरील पुलाचे लोकार्पण करण्यात येणार असून सायंकाळी ५.३० वाजता पोखरण सांद्रेवाडी बंधारा बांधकामाचे भूमिपूजन होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता आंब्रड येथे आंब्रड परबवाडी प्राथमिक शाळा सभामंडपाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

या सर्व विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडणार असून ग्रामस्थ तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती मिलिंद नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा