You are currently viewing उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 24 रोजी लायसन्स व फिटनेस सर्टिफिकेटचे कामकाज होणार नाही

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 24 रोजी लायसन्स व फिटनेस सर्टिफिकेटचे कामकाज होणार नाही

सिंधुदुर्गनगरी

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दि. 24 जानेवारी 2022 रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. तरी ज्या नागरिकांनी या कामांसाठी अपॉईंटमेंट घेतल्या आहेत त्यांची कामे दि. 25 व 27 जानेवारी 2022 रोजी अपॉईंटमेंटशिवाय करून देण्यात येणार, असल्याची माहिती सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली.

            उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अस्थापनेवरील 4 मोटार वाहन निरीक्षक व 9 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दि. 22 ते 24 जानेवारी 2022 या कालावधीत विभागीय अर्हता परीक्षा व विभागीय सेवाप्रवेशोत्तर परीक्षेसाठी ठाणे येथे उपस्थित राहणार आहेत. या कालावधीत कार्यालयात फक्त 1 मोटार वाहन निरीक्षक कर्तव्यावर असणार आहेत. त्यामुळे दि. 24 जानेवारी रोजी शिकाऊ तसेच पक्की अनुज्ञप्ती व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. तरी या कामांसाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या नागरिकांनी सदर दिवशी कार्यालयात येऊ नये असे आवाहनही श्री. काळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 3 =