You are currently viewing आजगाव ब्लॉकमधील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

आजगाव ब्लॉकमधील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

आजगाव ब्लॉकमधील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

पर्यावरण, शेती व पर्यटन धोक्यात येण्याची भीती; प्रशासनाला निवेदन सादर

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील आजगाव ब्लॉक परिसरात करण्यात आलेल्या माती सर्वेक्षण व प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. पर्यावरण बचाव दशक्रोशी समितीच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन सादर करून हा प्रकल्प तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

समितीने दिलेल्या निवेदनात संबंधित भागातील ग्रामपंचायतींनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थांचा स्पष्ट विरोध असतानाही संबंधित कंपनीला परवानगी देणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

अनेक गावांतील ग्रामस्थांचा एकमुखी विरोध

आजगाव, धाकोरे, मळेवाड, भोमवाडी, बांधवाडी, आरवली, सोन्सुरे, सागरतीर्थ, आसोली आदी गावांतील ग्रामस्थांनी या प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला एकमुखाने विरोध दर्शविला आहे. परिसरातील नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येत आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

पर्यावरण आणि पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती

मायनिंग प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण, शेती, जलस्रोत तसेच पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हा संपूर्ण परिसर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असून येथील नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा इशारा

ग्रामस्थांच्या भावना डावलून प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न झाल्यास भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही पर्यावरण बचाव दशक्रोशी समितीने प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
_________________________

*संवाद मीडिया*

*🚘 तुमच्या कुटुंबासाठी स्मार्ट आणि सुरक्षित निवड — Hyundai Exter!*

*✨ स्टाईल, सेफ्टी आणि शानदार मायलेजचा परफेक्ट संगम! ✨*

*Exter ला खास बनवणारी ५ दमदार वैशिष्ट्ये 👇*

*✅ परवडणारी किंमत*
*💰 फक्त ₹5.80 लाखांपासून*

*✅ जबर्दस्त CNG मायलेज*
*⛽ 27.1 किमी/कि.ग्रॅ. पर्यंत मायलेज*

*✅ स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स*
*⚙️ 4 सिलेंडर CNG इंजिनसह दमदार ड्रायव्हिंग अनुभव*

*✅ उच्च दर्जाची सुरक्षा*
*🛡️ 6 एअरबॅग्जसह 30+ स्टँडर्ड आणि 45+ आधुनिक सेफ्टी फीचर्स*

*✅ जास्त लगेज स्पेस*
*🧳 ड्युअल सिलेंडर CNG असूनही भरपूर बूट स्पेस*

*🎁 आजच टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!*

*🚗 Hyundai Motor Company अधिकृत विक्रेता*

*MAI Hyundai — अविरत सेवेची 27 वर्षे*

*📍 कुडाळ: उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे*
*📍 कणकवली: वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागदे*

*📞 संपर्क : 74100 06037*

*जाहिरात लिंक*👇

_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा