You are currently viewing वैभववाडी तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षपदी जयेंद्र रावराणे यांची बिनविरोध निवड

वैभववाडी तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षपदी जयेंद्र रावराणे यांची बिनविरोध निवड

आत्मा समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर

वैभववाडी

वैभववाडी तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षपदी माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आत्मा समितीची बैठक पंचायत समितीच्या सभागृहात आज पार पडली. या बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

आत्मा समिती कार्यकारिणी सदस्य – सौ अक्षता डाफळे (सभापती वैभववाडी), सुधीर नकाशे (जि. प. सदस्य), सौ. शारदा कांबळे (जि. प. सदस्य), श्रीमती पल्लवी झिमाळ (जि. प. सदस्य), सदस्य- बाप्पी मांजरेकर नाधवडे, अरविंद रावराणे सोनाळी, भालचंद्र साठे भुईबावडा, आईशा लांजेकर कोळपे, वैशाली रावराणे लोरे, किशोर दळवी उंबर्डे, मंगेश कदम खांबाळे, रुक्मिणी शेळके एडगांव, गौरी गावडे नापणे, सुषमा सरवणकर कोकिसरे, प्रदीप जैतापकर नापणे, नरेंद्र कोलते करूळ, तालुका खरेदी विक्री संघ प्रतिनिधी दिगंबर पाटील, प्रवण फार्मर प्रोड्यूसर कंपनी वैभववाडी प्रतिनिधी महेश संसारे, महेश रावराणे नावळे, संजय रावराणे नावळे, अनुज्ञा अंगवलकर निम-अरुळे, राजेंद्र राणे मांगवली, रमाकांत यादव नाधवडे, लक्ष्मी म्हेत्तर कोकिसरे, महेश गोखले नाधवडे, उत्तम सुतार आचिर्णे, सुहास सावंत नाधवडे यांचा समावेश आहे.

या बैठकीला सभापती अक्षता डाफळे, माजी सभापती नासीर काझी, उपसभापती अरविंद रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, माजी सभापती दिलीप रावराणे, मावळते अध्यक्ष महेश रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट, आत्मा सचिव राकेश हूले, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जयेंद्र रावराणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नूतन अध्यक्ष जयेंद्र रावराणे म्हणाले, या कार्यकारणीत सर्व अनुभवी व प्रगतशील शेतकरी आहेत. या तज्ञ मंडळींचा निश्चित फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कृषी विभागाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कारभार केला जाईल. माजी अध्यक्ष महेश रावराणे यांनी देखील चांगले काम केले आहे. त्याच पद्धतीने यापुढेही काम करूया असे रावराणे यांनी सांगितले. नूतन अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राकेश हुले यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा