You are currently viewing कनेडीत भाजप आणि ठाकरे यांच्यात झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल..

कनेडीत भाजप आणि ठाकरे यांच्यात झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल..

कणकवली :

 

काल झालेल्या कणकवली तालुक्यातील कनेडी बाजारपेठ येथील भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात दोन्ही पक्षाकडून झालेले मारहाण प्रकरणी एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये कुणाल सावंत यांनी आपल्याला मारहाण झाली असल्याचे सांगत तक्रार कणकवली पोलिसात दाखल केली असता पोलिसांनी संदेश सावंत, मंगेश बोभाटे, प्रफुल्ल काणेकर, किशोर परब यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी देखील पोलिसात तक्रार दाखल केली त्यामध्ये धक्काबुक्की व आपल्या सहकाऱ्याला मारहाण झाली असे सांगत तक्रार दाखल केली. त्यामध्ये 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सूर्यकांत तावडे यांनी आपल्याला मारहाण झाल्याचे सांगत तक्रार दाखल केली. यामध्ये 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर दोन्ही पक्षाच्या एकूण 16 कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला. कारण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली व कामात अडथळा आणला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामध्ये दोन्ही गटाच्या 16 जनांविरोधात 353 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या राडा प्रकरणी पोलिसांनी संशयतांची नावे देण्यास गुप्तता पळाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 10 =