You are currently viewing माता सप्तश्रृंगी देवी

माता सप्तश्रृंगी देवी

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची अष्टाक्षरी काव्यरचना

सप्तश्रृंगी गडावरी
देवी सप्तश्रृंगी माता
तूच जगदंबा आई
तारी संकटात त्राता

सप्तशृंगी नाव तुझे
सात शिखरी कळस
तीन द्वार दर्शनासी
मिळे दर्शन हे सरस

मूर्ती स्वयंभू देवीची
आदिशक्ती मूळ स्थान
साडी अकरा वार ती
खण चोळीला ते तीन

भुजा अठरा तुजला
मूर्ती लिपे शेंदुराने
स्वर्ण मुकुट डोईस
मुख शोभते नथीने

कंठी हे मंगळसूत्र
पुतळ्यांचे ते गाठले
तोडे पायी कटी पट्टा
कर्णीयांत कर्णफुले

ब्रम्हा विष्णू व महेश
तेज निर्मिती करिती
अंबे रुप सप्तशृंगी
पृथ्वीवर विराजित

आठ फुटी मूर्ती तुझी
पाषाणात कोरलेली
अर्ध शक्तीपीठ तुझे
तूचि मनी बसलेली.

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग. ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 17 =