You are currently viewing आधार

आधार

*आधार*

नको नको मज आधार तुझा,
करीन मन रिते हा निर्धार सखे.
तुझ्यासाठी जुना हा गाव माझा,
मुखी तुझ्या राहो माझं नाव सखे.
नको नको…

क्षण क्षण वेचिले आनंदा तुझ्या,
टोचले काटे माझ्या हृदयी सखे.
शब्द शब्द तुझे दुःख देती अनंत,
काट्यांशी कोण कारण विचारी सखे.
नको नको……

भूल मना झाली हे गुंतले तुझ्यात,
नको मज आता तो विचार सखे.
प्रश्न तुझे कितीक रुतले मनी,
निरर्थक झाले माझे उत्तर सखे.
नको नको….

कशी घालू समज मनाची तुझ्या,
वेड्यावाणी वागते खोटं बोलते सखे,
नको आता पुन्हा खोटं खोटं दुःख,
घायाळ मनास दुःख कुठे पेलते सखे.
नको नको…

विसरलो आनंद माझा सुखासाठी तुझ्या,
कवटाळूनी दुःख उराशी रडलो सखे.
सुखी तू रहा तुझ्या नव्या विश्वात,
फिरून बघू नको कधी दुःख दाटेल सखे.

नको नको मज आधार तुझा….
करीन मन रिते हा निर्धार सखे…..

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − ten =