You are currently viewing रुद्र मंथन

रुद्र मंथन

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक, कवी प्रा.डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना.

अलगद उतरला सोन कवडसा
श्रावण धारा मेघातुन
नाचूं लागले मोर केतकी
रंग मोहरले रेशमातुन

शिर शीर शीर शिर शिरला वारा
रूपेरी त्या पंखा तुन
ऊबदार ही शी ळ घालीत
राघु फिरला राना तुन

घड़ घड़ घड़ घड़ झाड़ हालले
हलला पक्षी देठा तुन
थर थर थर थर थर अंग मोहरले
ऊसवले हिरव्या पनातून

झर झर झर झर रुद्र मंथन ते
तलम सोन शला क्यातुं न
सा रे ग म सरगम उठती
वृंदावनी त्या वेणु तुन

बहरे रंग रंगीत बहार हा
सृजना च्या कर्ण कोषा तुन
कोश्यातुन तृप्त झाले
नीसटले मोती चोची तुन

हर हर हर हरदी नी अमृत वाणी
स्त्रवते पाणी झर्या तुन
तड तड तड शब्द पाझरे
वागेश्वरी च्या लेखणी तुन

प्रो डॉ गंगाधर उर्फ प्रवीण जोशी
नसलापुर ता रायबाग
जि बेलगांव
कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − three =