You are currently viewing ओसरगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पुन्हा प्रदीप तळेकर यांची निवड..

ओसरगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पुन्हा प्रदीप तळेकर यांची निवड..

सिंधुदुर्ग

ओसरगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रदिप पुंडलीक तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना काळातील दीड वर्षानंतर प्रथम झालेल्या ग्रामसभेत हि नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप तळेकर यांनी याआधी ओसरगाव चे उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, देवस्थान खजिनदार, अशा विविध सामाजिक क्षेत्रात गेली 30 वर्ष काम करत आहेत. प्रदीप तळेकर यांची गेली 11 वर्षे सतत ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात येत आहे. यावेळी प्रदीप तळेकर यांनी ओसरगाव ग्रामस्थांचे आभार मानले असून यापुढे जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली जाईल. असे सांगितले

यावेळी ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, उपसरपंच मुरलीधर परब, पोलीस पाटील सौ संजना आंगणे, विश्वनाथ परब, गजानन तळेकर ,विजय परब, प्रभाकर सावंत, सत्यवान देसाई, प्रदीप राणे ,दशरथ शिंदे, दिनेश अपराध , आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा