You are currently viewing पत्रकारांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्यावे…

पत्रकारांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्यावे…

भाजपा आमदार प्रसाद लाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कणकवली / प्रतिनिधी :-

काल टीव्ही ९ या चित्रवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ सुसज्ज बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका झुंजार पत्रकाराचा अत्यंत करुणाजनक स्थितीत अंत झाला. या आधी देखील असे अनेक मृत्यू सामान्यांचेही झाले आहेत . खरंतर हे राज्याच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने खेदजनक गोष्ट आहे . अशा परिस्थितीतही कोरोना योद्ध्यांमधील डॉक्टर्ज , नर्सेस , पोलीस , स्वच्छता कर्मचारी यांच्याप्रमाणेच पत्रकार बंधू, भगिनीना देखील ५० लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी भाजपा आ.प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पत्रकार रस्त्यावर काम करत असतानाच पांडुरंग रायकर कोरोनाने गाठले आहे. कोरोना योध्दाना सरकारने ५० लाखाचे विमा कवच प्रदान केले आहे, तसेच जे शासनमान्य अधीस्वीकृतीधारक अधिकृत पत्रकार असतील त्या सर्वानाच शासनाने ५० लाखाचे विमा कवच प्रदान करावे . हे पत्रकार बंधू भगिनीदेखील कोरोना योद्धेच आहेत हे लक्षात घेऊनच त्यांना हे कवच प्रदान करावे आणि कोरोनामुळे त्यांच्या पैकी कोणाचा दुर्दैवी मृत्यू झालाच तर ही रक्कम त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करावी जेणेकरून काही प्रमाणात त्यांचे दु : ख हलके होईल . माझ्या या विनंतीचा आपण माणुसकीच्या दृष्टीकोनातून नक्कीच विचार कराल याची खात्री बाळगतो,अशी मागणी पत्राद्वारे आ. प्रसाद लाड यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 20 =