You are currently viewing कर्तबगार स्त्री

कर्तबगार स्त्री

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शीर्षक:- कर्तबगार स्त्री.*

**********************

 

ती आहे आदिमाया,

ती प्रेमाची शीतल छाया..।१।

 

ती साक्षात दयेचा आगार,

ती स्नेहाचा दिव्य भांडार..।२।

 

झिजते घरासाठी बनून चंदन

सारी दुनिया करते तिला वंदन..।३।

 

संकटांना देऊन सदा चोप

गरूडासारखी घेते झेप…।४।

 

दुःख साठवते नित्य पोटात

गोड बोल तिच्या ओठात..।५।

 

चेहऱ्यावर स्मितहास्य असते,

जिभेवर तिच्या संगीत वसते..।६।

 

शब्दांमधूनी आनंद वाहे,

स्वागत करण्या सज्ज राहे..।७।

 

ती आहे मोठी कर्तबगार,

आणते खेचून विजय शानदार..।८।

 

 

✍🏻 *अख़्तर पठाण.*

*(नासिक रोड)*

*मो.:-9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 4 =