You are currently viewing फोंडाघाट येथील पॉवर लिफ्टींग स्पर्धेत कासार्डेचा कैलास पवार अव्वल

फोंडाघाट येथील पॉवर लिफ्टींग स्पर्धेत कासार्डेचा कैलास पवार अव्वल

कु. स्वप्नाली कदम दोन इव्हेंन्टमध्ये चमकली…

तळेरे-: प्रतिनिधी

फ्युचर फिट जिम फोंडाघाट आयोजित पॉवर लिफ्टींग स्पर्धेत कासार्डे येथील वैभव मुद्राळे हेल्थ झोनचा कैलास पवार व कु स्वप्नाली कदम यांनी यश संपादन केले. कैलास पवार या खेळाडूने ज्युनिअर पॉवर लिफ्टींग या गटात 385 kg वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मुलीनं मध्ये कु स्वप्नाली कदम हिने ज्युनिअर पॉवर लिफ्टींग या गटात 180 kg वजन उचलून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच कु स्वप्नाली हिने दोरी उडी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक आणि मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. विजेत्यांचे टीम वैभव यांच्या वतीने जिम मध्ये गौरविण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्ती आर्मी ऑफिसर श्री रवींद्र पाताडे , शाशंक तळेकर, शिक्षक राजीव बिरादार तसेच जिम मधील सर्व व्यायामपटू उपस्थित होते. सर्व खेळाडूंना व्यायाम शाळेचे संचालक वैभव मुद्राळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन राजीव बिरादार यांनी केले. त्यावेळी लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्या दिल्या.

फोंडाघाट येथील स्पर्धेतील कासार्डे हेल्थ क्लबच्या यशस्वी खेळाडू सोबत सेवानिवृत्त सैनिक रविंद्र पाताडे, संचालक वैभव मुद्राळे शशांक तळेकर व इतर,

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 11 =