*दोडामामार्गात १७ मे ला सांस्कृतिक लोककला महोत्सव*
*🔸सांस्कृतिक लोककला मंच,दोडामार्गच्यावतीने आयोजन 🔸उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान आणि सत्कार 🔸महिला कर्तृत्व सन्मान सोहळा 🔸अनेक कलापथकांचा सहभाग, शेकडोंच्या संख्येने होणार कलाकार सहभागी*
*दोडामार्ग :
सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्गच्यावतीने १७ मे २०२६ रोजी श्री देव खंडोबा सभागृह, सरगवे पुनर्वसन येथे सांस्कृतिक लोककला महोत्सव २०२६ चे (तृतीय वर्ष) आयोजन करण्यात आले आहे. लोककला महोत्सवाचा उदघाट्न सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. लोककला महोत्सवाचा उदघाट्न सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील तमाम कलाकारांचे एकजुटीचे प्रतीक म्हणून हा महोत्सव साजरा होणार आहे. यात लोककलेतील अनेक कलापथकांचा सहभाग असणार असून शेकडोंच्या संख्येने कलाकार सहभागी होणार आहेत. अशी माहिती मंचाचे अध्यक्ष शंकर जाधव यांनी दिली.
राज्यातील सांस्कृतिक व पारंपरिक कलेची लोकांना माहिती व्हावी, तसेच त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्गतर्फे करण्यात येते.
यासाठी राज्यात आणि खासकरून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासह दोडामार्ग तालुक्यात ज्या संस्था आणि कलाकारांनी लोककला जोपसल्या आहेत आणि जोपासत आहेत, अशा विविध लोककला सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेऊन लोककला महोत्सव आयोजित केले जातात. त्याच धर्तीवर दोडामार्ग तालुक्यातील कानाकोप-यातल्या विशेषतः ग्रामीण भागात फुगडी, समई नृत्य, वासुदेव आला, समूह गीत, भजन, रनमाला, कोळी नृत्य, दशावतार, दिंडी, सनई वादन, माण वादन, बासरी वादन, भरत नाट्यम, तालगडी, मिमिक्री, धालोत्सव, ओवी, वाघखेळ, व्हायोलीन वादन, कळशी नृत्य, चपई नृत्य, कीर्तन, लावणी, परंपरागत ढोलवादन, घुमट वादन, गोपनृत्य, मूर्तिकार, पिंगळा, कळसूत्री बाहुली, लेझिम, टिपरी, तुतारी वादन, तमाशा, दशावतार, खडीगंमत आदींसारख्या लोककला प्रकारांची पुढील पिढीला माहितो व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्याच्या हेतूने सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्ग या मंचाच्या माध्यमातून दर वर्षी सांस्कृतिक लोककला महोत्सव आयोजित केला जातो.
आदीं सारख्या लोककला प्रकारांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्याच्या हेतूने सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्ग या मंचाच्या माध्यमातून दर वर्षी सांस्कृतिक लोककला महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षी रविवार १७ मे २०२६ रोजी दोडामार्ग तालुकास्तरीय लोककला महोत्सव श्री देव खंडोबा सभागृह, सरगवे पुनर्वसन येथे सांस्कृतिक लोककला महोत्सव २०२६ चे (तृतीय वर्ष) आयोजन करण्यात येत आहे.
*🔸सत्कारमूर्ती असे :-* श्री. तुळशीदास दत्ताराम नाईक (पत्रकार) साटेली, ता. दोडामार्ग,श्री. तेजस तुकाराम देसाई (पत्रकार तथा लोक प्रतिनिधी) केर,ता. दोडामार्ग,श्री. लक्ष्मण बाळा नाईक (मालक :- नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर, ता. दोडामार्ग), ऍड. सोनू आत्माराम गवस (वकील आणि नाट्य अभिनय) पिकुळे, ता. दोडामार्ग, श्री.सदाशिव दादा पाटगावकर (नाट्य अभिनय आणि दिग्दर्शक) घोटगेवाडी, ता. दोडामार्ग,डॉ. जगदीश सुनंदा लालासाहेब पाटील (वैध्यकीय अधिकारी :- प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी,ता. दोडामार्ग),श्री.अर्जुन रामा पारधी (भजन कलाकार) बोडदे, ता. दोडामार्ग,श्री.विठ्ठल सोमनाथ म्हावळणकर (दशावतार कलाकार ) कळणे, ता. दोडामार्ग,डॉ. सुरज सुरेश गावकर आडाळी, ता. दोडामार्ग, डॉ. ओंकार अंकुश कविटकर सरगवे, ता. दोडामार्ग, श्री. विष्णू शिवा सुतार (भजनी आणि मूर्ती कारागीर) साटेली, ता. दोडामार्ग, श्री. गोकुळदास सूर्याजी तोरसकर (नाट्य दिग्दर्शक) दोडामार्ग,ता. दोडामार्ग, श्री. वासुदेव शिवराम गायचोर (वायरमन) साळगाव, ता. कुडाळ, श्री. विजय विठ्ठल डेगवेकर (तलाठी) डेगवे, ता. सावंतवाडी,अशा प्रकारे विविध क्षेत्रात निस्वार्थपणे उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीचा सत्कार होणार आहे.
*🔸संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग आणि सन्मान सोहळा :-* दोडामार्ग तालुक्यातील निवडक, नामवंत दशावतार कलाकार यांचा संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग या महोत्सवात सादर होणार आहे. या नाटकात सहभागी असलेल्या कलाकार यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
*🔸महिला कर्तृत्व सन्मान सोहळा :-* बचत गटाच्या माध्यमातून अत्यंत प्रामाणिकपणे, कष्टाने आणि जिद्दीने आर्थिक सक्षमीकरणाचे कार्य केले अशा महिला बचत गट आणि त्या बचत गटातील महिलांनी बचत गटाच्या नियमांचे पालन करून, नियमित बचत आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असलेल्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे.
