You are currently viewing राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी घेतली शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सिंधुदुर्ग यांची भेट

राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी घेतली शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सिंधुदुर्ग यांची भेट

सिंधुदुर्गातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक डॉ मुश्ताक शेख यांची भेट घेतली .राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सिंधुदुर्ग शाखेची स्थापना केल्या बाबतचे निवेदन त्यावेळी देण्यात आले . भेटी प्रसंगी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली .दिनांक 19 जानेवारी 2022 च्या शासन पत्रानुसार जिल्हा परिषदेच्या अधिकारी -वर्ग १ ,अधिकारी वर्ग – २या संवर्गातील -शिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी , गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख ही पदे सरळ सेवा पदोन्नतीने भरण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार माहिती संकलनाचे काम सुरू आहे .राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सदर पदांची अग्रक्रमाने पदोन्नती मिळण्याकरिता पत्राद्वारे माहिती संकलनाचे काम सुरू आहे .सदर पत्राच्या संदर्भाने प्राथमिक विभागातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या माहितीच्या संकलनाचे चे पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयाकडून काढलेले असून माहिती संकलनाचे काम सुरू आहे . मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे माहिती संकलनासाठीचे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयाकडून अद्याप काढलेले नाही ही बाब चर्चेद्वारे शिक्षणाधिकारी माध्यमिक सिंधुदुर्ग डॉ .मुश्ताक शेख यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याप्रमाणे नजीकच्या कालावधीतच शिक्षणाधिकारी माध्यमिक सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयाकडून पत्र काढले जावे असे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष – दशरथ शिंगारे यांनी सांगितले .शासन परिपत्रकातील संदर्भानुसार इतर जिल्ह्यात माहिती घेऊन राष्ट्रीय व राज्य माध्यमिक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती मागवण्यासाठी पत्र काढण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन डॉ . मुस्ताक शेख यांनी सिंधुदुर्गातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले .तसेच वेळोवेळी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांकरिता त्यांच्या प्रश्नासंदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सिंधुदुर्ग यांचे कार्यालयाकडून योग्य व आवश्यक सहकार्य त्यांना व संघटनेला केले जाईल असे ही त्यांनी जाहिर केले.संघटनेच्यावतीने निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने दशरथ शिंगारे -राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र ,शिवराज सावंत -जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग , संदीप शिंदे -सरचिटणीस ,विजय भोगले -मार्गदर्शक सल्लागार , विठ्ठलकदम -मुख्य संघटक , उदय गोसावी -कोषाध्यक्ष आदी उपस्थित होते .

डॉ. मुस्ताक शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सिंधुदुर्ग यांना राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने निवेदन देताना दशरथ शिंगारे -राज्य कार्याध्यक्ष , शिवराज सावंत -जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग , संदीप शिंदे – सरचिटणीस, विजय भोगले – मार्गदर्शक सल्लागार , विठ्ठल कदम – मुख्य संघटक, उदय गोसावी -कोषाध्यक्ष .आदी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − three =