You are currently viewing उत्तरप्रदेश येथील शेतकरी नरसंहाराचा वैभववाडी युवक काॕग्रेसने केला निषेध

उत्तरप्रदेश येथील शेतकरी नरसंहाराचा वैभववाडी युवक काॕग्रेसने केला निषेध

शेतकऱ्यांच्या मारेकऱ्याना अटक करण्याची मागणी

वैभववाडी

उत्तरप्रदेश लखीमपूर खीर येथील शेतकरी नरसंहाराचा वैभववाडी तालुका युवक काॕग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.तर शेतकऱ्यांना मारणा-या व राष्ट्रीय काॕग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना नजरकैदेत ठेवणा-या भाजपा सरकारचा निषेध करीत शेतकऱ्यांच्या मारेक-यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

उत्तरप्रदेश लखीमपूर खेरी येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात गाडी घुसवून शेतकऱ्यांना मारण्यात आले आहे.तर काॕग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना नजरकैदेत ठेवणा-या भाजप सरकारचा तीव्र निषेध करीत.तसेच शेतकऱ्यांच्या मारेक- यांना लकवकरात लवकर अटक करावी.अशा मागणीचे निवेदन तहसिलदार रामदास झळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रीय युवक काॕग्रेस वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, जिल्हा काॕग्रेसनेते आनंद जाधव, मंगेश वळंजू, सिध्दार्थ कांबळे, संभाजी गुरव, सिध्दि रावराणे, आकाश जाधव, रितेश जाधव, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा