You are currently viewing चोवीस तासात मालवणात पावसाचे दीड शतक

चोवीस तासात मालवणात पावसाचे दीड शतक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 150 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 58.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 4000.0325 मि.मी. पाऊस झाला आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 54 (3902), सावंतवाडी – 69 (4307.1), वेंगुर्ला – 96 (3228.2), कुडाळ – 52 (3930), मालवण – 150 (4389.96), कणकवली – 18 (4266), देवगड – 17 (3411),  वैभववाडी – 15 (4566) पाऊस झाला आहे.

            आतापर्यंत सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 4 हजार 566 मि.मी. झाला असून त्याखालोखाल मालवण, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, दोडामार्ग आणि देवगड तालुक्यात पाऊस झाला आहे. सर्वात कमी वेंगुर्ला तालुक्यात 3 हजार 228 पूर्णांक 2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =