You are currently viewing महालय

महालय

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची पितृपक्षातील महालय श्राद्ध आणि जिवंतपणी नात्यांकडे केलेला दुर्लक्ष यावर भाष्य करणारी काव्यरचना

पितृपक्षात श्राद्धविधी
पित्तरांची केली सेवा
जिवंतपणी आईबाप
अन्नासाठी महाग देवा

असे पर्यंत आईबाप
त्यांना पोटभर घाला
कोणी पाहिला आत्मा
म्हणे तृप्त तोचि झाला

आईबापाच्या नावाने
दुजास अन्नदान केले
आत्म्यापेक्षा जन्मदाते
श्रेष्ठ कसे नाही वाटले

पोट भरण्या मुलाबाळांचे
आईबापाने कष्ट उपसले
हास्य मुलाच्या मुखावर
त्यांच्या घामातूनच आले

भिंतीवर फोटो टांगून
तिथीला केली आठवण
विसरतील का मृतात्मे
अपमानीत झालेले क्षण

पिठाचे पिंड पूजुनी
कावळ्यास वाढी पानात
एवढं करून मिळेल का
स्थान आईबापाच्या मनात?

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =